Nagpur Crime: जेव्हा रक्षकच भक्षक बनतो! नागपुरात लग्नाचं अमिष अन् वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेवून ठेवले संबंध, फोटो व्हायरल करण्याची धमकी, पोलीस कर्मचाऱ्यावर पीडितेचा गंभीर आरोप
Nagpur Crime: उमेश शेळके असे आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उमेशच्या विरोधात 23 वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिल नगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर: साताऱ्यानंतर नागपुरातही पोलिसावर तरुणीच्या लैंगिक छळाचा (Nagpur Crime News) आरोप केला आहे. गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे उलटले तरीदेखील आरोपी पोलिसाला शोधण्यात नागपूर पोलीस अपयशी होत आहेत. तर याबाबत विचारलेल्या प्रश्नावरती ते म्हणाले पोलीस कर्मचारी फरार झाला आहे. साताऱ्यात (Nagpur Crime News)महिला डॉक्टरच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक छळाचे आरोप सध्या राज्याभरात गाजत असताना नागपूरातही एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणीचा लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप लागले आहे. उमेश शेळके असे आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उमेशच्या विरोधात 23 वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिल नगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nagpur Crime News)
Nagpur Crime News : आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शोधण्यात गेले तीन आठवडे अपयशी
पोलीस स्टेशनमध्ये उमेशने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी तीन आठवड्यांपूर्वी तक्रार दिली होती. पोलिस कर्मचाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही आरोपी विरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शोधण्यात गेले तीन आठवडे अपयशी ठरले असून तो फरार झाला आहे एवढंच उत्तर पोलिसांकडून दिल जात आहे.
Nagpur Crime News : तो मला अनेक हॉटेलमध्ये नेत होता
याप्रकरणी पीडित तरुणीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, तो मला अनेक हॉटेलमध्ये नेत होता, ओयो हॉटेलमध्ये घेऊन जायचा. मी या प्रकरणी कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, वीस दिवस झाले तरी देखील अद्याप त्याला अटक केली नाही. उमेश शेळके असं त्याचं नाव आहे. तो एक पोलीस कर्मचारी आहे. त्याने अनेक वेळा माझं शारीरिक शोषण केलं आहे. त्याने माझ्या आई-वडिलांच्या समोर माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. आता तो त्याबाबत पलटत आहे आणि म्हणतोय मंगळसूत्र घातलेलं नाही. माझ्यासोबत अर्ध लग्न केलं होतं. माझ्या घरच्यांसमोर त्याने मंगळसूत्र घातलं होतं. आता तो ते नाकारत आहे. पोलीस देखील त्याला वाचवत आहेत. मी सीपी ऑफिसला देखील खूप वेळा तक्रार दिली आहे. मी अर्ज देखील दिला आहे, तरी देखील अद्याप सीपींनी त्याला निलंबित केलं, ना अटक केली आहे. कोर्टामध्ये माझा जबाब घेतला आहे, माझ्या घरच्यांचा देखील जबाब घेतला आहे. पण अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
Nagpur Crime News : तर तुझे फोटो सोशल मीडियावर अपलोड करेन
मी मे महिन्यापासून तक्रार देत आहे. माझी अनेक वेळा तक्रार घेतली नव्हती. मे महिन्यात रात्री एक दीड वाजता मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण माझी तक्रार घेतली गेली नाही. चार-पाच वेळा मी अर्ज दिला होता. तो मला वारंवार धमक्या देत होता, जर तू भेटायला आली नाहीस, तर तुझे फोटो सोशल मीडियावर अपलोड करेन. माझे त्याच्यासोबतचे फोटो होते. तो ते इंस्टाग्रामवरती व्हायरल करेल असं सांगत होता. चार तारखेला मी तक्रार दिली होती, रात्री माझी तक्रार नोंदवली गेली, रात्री साडेनऊच्या दरम्यान घेतली आणि ओयोपेस हॉटेल येथे त्यांनी तपास केला होता, त्यानंतर रात्री एक वाजता मला घरी नेऊन सोडलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मेडिकलला पाठवलं. त्यानंतर मी पीआय यांच्याशी बोलले ते म्हटले मी उद्या त्याला अटक करतो, पण आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही, असंही पिडितेने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


















