Nagpur Bogus Teacher Scam : नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त (Bogus Teacher Appointment) करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. शिवाय दोषी आढळ्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे. दरम्यान, 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी एक गुन्हा सायबर सेल मध्ये ही नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पथक याचा तपास करत आहे. 

Continues below advertisement

वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे

नागपूरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी एक गुन्हा सायबर सेलमध्ये ही नोंदवण्यात आला असून सध्या सायबर पोलीस ठाण्याचे पथक त्याचा तपास करत असल्याची माहिती आहे. या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस (डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन) वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ऍड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसले आहे.

नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20  ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement