Mohan Bhagwat : "एका वर्षांपासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. त्यापूर्वी दहा वर्ष मणिपूर शांत होतं. मात्र, अचानक तिथे अशांतता निर्माण झाली, किंवा निर्माण करण्यात आली. त्या आगीत मणिपूर आज ही जळत आहे,  त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार?" असा सवाल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर पुढे मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक आहे, याची आठवण ही त्यांनी सरकारला करून दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय"च्या समापन सोहळ्यात आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. 


संघासारख्या संघटनाना ही नाहक ओढण्यात आले


मोहन भागवत म्हणाले, निवडणूक लढवताना एक मर्यादा असते, मात्र, यंदा देशातील निवडणुकीत त्या मर्यादेचा पालन झालं नाही. प्रचारातील वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल याचा विचार ही केला गेला नाही. त्यामध्ये संघासारख्या संघटनाना ही नाहक ओढण्यात आले. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडले गेले. हे योग्य नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवडणुकीनंतर त्यांच्या पहिल्याच भाषणात निवडणुकीतील यंदाच्या प्रचारावर व्यक्त तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


 भविष्याचा विचार करत देशा पुढील समस्या सोडवायच्या आहेत


पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, आता सरकार बसले असून निवडणुकीच्या आवेशात जे काही अतिरेक यंदा घडले. त्याच्या पुढे जाऊन आता आपल्याला भविष्याचा विचार करत देशा पुढील समस्या सोडवायच्या आहेत, याची आठवण ही सरसंघचालकांनी करून दिली. दरम्यान सरसंघचालकांनी आज व्यक्त केलेली नाराजी काँग्रेसच्या प्रचाराबद्दल होती की सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर आरोप करताना वापरलेल्या तीव्र मुद्द्यांबद्दल होती हे स्पष्ट नाही.


सामाजिक समता शिकायची असेल तर संघाच्या शाखेत आले पाहिजे


भारताच्या वैविध्यमध्येच ऐक्य आहे. आपली पूजा पद्धती मान्य करता तर इतरांची पूजा पद्धती मान्य केली पाहिजे. आपण अनेक शतकं अस्पृश्यता पाळली. कुठे ही वेद, धर्मग्रंथात त्याचा उल्लेख नव्हता, तरी ते घडले. हजारो वर्ष अस्पृश्यता पाळली गेली, त्यामुळे त्याबद्दल नाराजी ही आहे. झालेल्या अन्यायाबद्दल जी नाराजी आहे, त्यामुळेच आपलेच काही लोक रुसलेले आहेत. रोटी, बेटी, भेटणे, एकमेकात मिसळणे हे सर्व व्यवहार होणे आवश्यक आहे. सामाजिक समता शिकायची आहे तर संघाच्या शाखेत आले पाहिजे. संघाचे स्वंयसेवक आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Nilesh Lanke : संसदेत विचारतील हा कोण गडी आणला, निलेशजी मराठीत काय बोलतील याचा भरोसा नाही, शरद पवारांकडून लंकेंवर कौतुकाचा वर्षाव