नागपूर : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आज पापा राव या वरिष्ठ माओवादी कमांडरच्या आत्मसमर्पणाच्या दिवशीच भारतीय सुरक्षा दलाला दुसरा मोठं यश ओडिशामधून मिळालं आहे. माओवाद्यांच्या ओडिशा राज्य समितीचा प्रमुख सुकरु उर्फ कोशा सोढी या 49 वर्षीय माओवादी कमांडर ने ओडिशा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यासोबत इतर चार पुरुष माओवाद्यांनीही आपले शस्त्र खाली ठेवले आहे. त्यामुळं सुरक्षा दलांना आज दोन मोठी यश मिळाले आहे.
सुकरुवर 55 लाख रुपयांचे बक्षीस होते
सुकरु उर्फ कोशा सोढी ओडिशा मधील मोस्ट वॉन्टेड माओवादी कमांडर होता. 31 वर्षांपासून सशस्त्र माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या सुकरुवर 55 लाख रुपयांचे बक्षीस होते. विशेष म्हणजे आज आत्मसमर्पण करणाऱ्या सुकरु ने काही दिवसांपूर्वी ओडीसा मधील माओवाद्यांचा मिलिटरी प्रमुख अन्वेष उर्फ रेणू या 31 वर्षीय माओवादी कमांडरशी फक्त यामुळे हत्या केली होती, कारण तो आत्मसमर्पण करण्यासाठी सर्वांना तयार करत होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत आत्मसमर्पणाच्या मुद्द्यावरुन आपल्या सहकाऱ्यांची हत्या करणाऱ्या सुकरु ने आज मात्र स्वतः आपले शस्त्र पोलिसांसमोर ठेवले.
एकाच दिवसात पापाराव आणि सुकरु या माओवाद्यांशी केलं आत्मसमर्पण
एकाच दिवसात पापाराव आणि सुकरू या छत्तीसगड आणि ओडिसा मधील दोन मोठ्या माओवादी कमांडर्स ने सहकाऱ्यांसह शस्त्र खाली ठेवल्यामुळे 31 मार्च 2026 पूर्वी रेड कॉरिडोर सशस्त्र माओवाद मुक्त करण्याचा नियोजन आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. दरम्यान अजूनही माओवाद्यांचा सर्वोच्च आणि वयोवृद्ध नेता ज्याला माओवाद्यांचा मास्टरमाइंड ही मानलं जातं, तो गणपती उर्फ मुपल्ला लक्ष्मणराव अजूनही फरार आहे. गणपती कुठे आहे हे अद्यापही कोणालाच माहीत नाही. शिवाय झारखंडमध्ये सक्रिय असलेला मिशीर बेसरा उर्फ भास्कर हा वरिष्ठ कमांडर ही त्याच्या सुमारे 40 सहकाऱ्यांसह अजून ही फरार आहे. हे दोन वरिष्ठ माओवादी नेते सुरक्षा दलांच्या हाती लागल्याशिवाय किंवा त्यांनी आत्मसमर्पण केल्याशिवाय एकेकाळी माओवाद्यांचा वर्चस्व असलेला रेड कॉरिडोर सशस्त्र माओवाद पासून मुक्त झाला असे म्हणता येणार नाही.
31 वर्षांपासून सशस्त्र माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या सुकरुवर 55 लाख रुपयांचे बक्षीस होते. विशेष म्हणजे आज आत्मसमर्पण करणाऱ्या सुकरु ने काही दिवसांपूर्वी ओडीसा मधील माओवाद्यांचा मिलिटरी प्रमुख अन्वेष उर्फ रेणू या 31 वर्षीय माओवादी कमांडरशी हत्या केली होती, कारण तो आत्मसमर्पण करण्यासाठी सर्वांना तयार करत होता. याच कारणामुळं अन्वेष उर्फ रेणूची हत्या करण्यात आली होती.