(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election: उपराजधानीत आज भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन; युवा मोर्चाची तरुणाईला साद
BJP: भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज नागपूरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संबोधित करणार आहे.
Nagpur News नागपूर: लोकसभा निवडणुकींचा (Lok Sabha Election) शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून तरुणाई आणि नवमतदारांना विशेष साद घालण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्य भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने उपराजधानी नागपूरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur News) विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात या संमेलनाला आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्यभरातील 18 ते 35 वयोगटातील 1 लाख युवक सहभागी होणार असल्याचा दावा भाजयुमोतर्फे करण्यात आला आहे. मेळाव्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या (BJP MP Tejasvi Surya) हे युवा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
भाजपची तरुणाईला साद
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा कल निर्णायक ठरणार आहे. तरुणाईने केलेल्या मताधिक्क्याच्या आधारावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 वर्षांनंतर पूर्ण बहुमताची सरकार देशात स्थापन करता आले होते. त्या अनुषंगाने भाजप आपली संपूर्ण ताकद तरुणाई आणि नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लावतांना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजयुमोच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आज नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख तरुण सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. संमेलनात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आगामी 25 वर्षांतील वाटचालीची दिशा मांडतील. सोबतच हे अधिवेशन आटोपल्यावर राज्यभरातच 'नमो युवा चौपाल'चे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून 10 लाखांहून अधिक तरुणांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाला आहे. तर या कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख नेत्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, सरचिटणीस आणि प्रभारी सुनील बन्सल हे देखील उपस्थित असणार आहे.
2024 च्या निवडणुकांसाठी तरुणांची गर्जना
नागपूरात होत असलेले हे संमेलन म्हणजे 2024 च्या निवडणुकांसाठी तरुणांची गर्जना असणार आहे. यात विविध शाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्व क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर्सनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. संमेलनस्थळी मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे युवा स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे ही आपल्या समर्थकांसह आज या संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राणा दांपत्य भाजपच्या वाटेवर आहेत का? या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
CBI : नागपूर-भोपाळमध्ये CBI ची कारवाई, NHAI च्या अधिकाऱ्यासह 6 जण अटकेत, 20 लाखांची लाच घेतल्याचा आरोप