JEE Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे.  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आज जेईई मुख्य परीक्षा- 2022 सत्र एकचा जाहीर केलेल्या निकालात  महाराष्ट्रातून नागपूरचा अद्वय क्रिष्णा हा प्रथम आला आहे. त्याला 99.998449 टक्के मिळाले आहेत. 


या यशाने अत्यंत आनंदित असलेल्या अद्वयने अभ्यासात ठेवलेलं सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे एबीपी माझाकडे बोलून दाखवलं. तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी असून सध्या सीबीएसई बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. परीक्षा दिली आहे. भविष्यात अद्वयला आयआयटीला प्रवेश घ्यायचा आहे. अद्वयचे वडील वेस्टर्न कोलफिल्ड्सला नौकरीला आहेत. 


दरम्यान एनटीए जेईई मुख्य परीक्षा सत्र 2 ही परीक्षा 21 ते 30  जुलै या कालावधीत होईल. सत्र 2 ची परीक्षा पार झाल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक  आणि कट ऑफ जाहीर होईल.


जेईई मेन परीक्षेच्या (JEE Main Result 2022) तारखांमध्ये काही बदल करण्यात आला होता. साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये जेईई मेन परीक्षा घेण्यात येते. पण यंदाच्या वर्षी परीक्षेची तारीख आधी मे महिना आणि त्यानंतर जून महिन्यात पुढे ढकलण्यात आली होती. जेईई मेन पहिल्या सत्राची परीक्षा 20 जून 2022 ते 29 जून 2022 या कालावधीत घेण्यात आली.


जेईई मेनचा निकाल कसा तपासाल? (Check JEE Main Result 2022)



  • स्टेप 1 :  विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

  • स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवर JEE Main Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.

  • स्टेप 3 : यानंतर विद्यार्थ्याने आयडी आणि पासवर्ढ प्रविष्ट करावा.

  • स्टेप 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.

  • स्टेप 5 : विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.

  • स्टेप 6 : गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.  


जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा कधी?
जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.