Nagpur Couple Died in Italy: नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा आणि त्यांच्या पत्नीचा इटलीमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमधील भारतीय दूतावासाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. इटलीमधील (Italy) ग्रोसेटो शहरात हा अपघात (Road Accident) झाला. या अपघातामध्ये नागपूरच्या (Nagpur News) अख्तर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची एक मुलगी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय दूतावासातील अधिकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून जावेद अख्तर यांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला असून आता मुलीला वाचवण्यासाठी भारतीय दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे. (Nagpur Gulshan plaza Hotel)

Continues below advertisement

जावेद अख्तर हे नागपूरमधील गुलशन प्लाझा हॉटेलचे मालक होते. ते त्यांची पत्नी नद्र अख्तर आणि 24 वर्षांच्या मुलीसोबत इटलीमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी ग्रोसेटो शहरात त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये अख्तर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची बातमी नागपूरमध्ये धडकताच शहरवासियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Sindhudugr News: सिंधुदुर्गात अख्खं कुटुंब समुद्रात बुडालं, तिघांचा जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटनासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथील पर्यटकांवर काल काळाने घाला घातला. शिरोडा-वेळागर येथे हे कुटुंबीय पर्यटनासाठी आले असता समुद्रात उतरलेल्या नऊ जण बुडाले. त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आला. तर इतर आठ पर्यटकांपैकी एकाला वाचवण्यात आले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले. तर तीनजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. आता आठ वाजल्यानंतर पुन्हा शोधकार्य सुरू झाले आहे. आज सकाळी शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांपैकी अजून एकाचा मृतदेह आरवली सागरतीर्थ येथे सापडला. लोंढा-बेळगाव येथील कित्तुर कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.

Continues below advertisement

समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची माहिती 

इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७. रा. लोंढा, बेळगाव (वाचली आहे)

फरहान इरफान कित्तूर, लोंढा, बेळगाव (मयत)

इबाद इरफान कित्तूर , रा. लोंढा,  बेळगाव (मयत) 

नमीरा आफताब अख्तर ल, रा. अल्लावर,  बेळगाव (मयत)

बेपत्ता पर्यटकांची माहिती 

इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, रा. लोंढा, बेळगाव 

इक्वान इमरान कित्तूर, रा. लोंढा, बेळगाव 

फरहान मोहम्मद मणियार, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग 

जाकीर निसार मणियार, रा. कुडाळ जिल्हा  सिंधुदुर्ग.

आणखी वाचा

क्लासवरुन येताना खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले, दोन सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना