नागपूर: आईच्या कागदपत्रांवरून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र (Scheduled Caste Certificate) मिळावे, याकरिता वरोरा तालुक्यातील एका मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench of Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या 15 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या मुलाच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला आहे. आई-वडील विभक्त झाले. त्यावेळी मुलगा लहान होता. तेव्हापासून आईनेच त्याचे संगोपन व शिक्षण केले. त्याचा वडिलासोबत काहीच संपर्क नाही. त्याच्याकडे वडिलाच्या जातीची कागदपत्रेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याने आईच्या कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उप-विभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. त्या अर्जासोबत आईचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व या जातीशी (Caste) संबंधित इतर कागदपत्रे जोडले होते.


कायद्यानुसार मुलाला जात प्रमाणपत्र जारी करताना वडिलाच्या जातीचे पुरावे विचारात घेतल्या जात असते. या मुलाकडे वडिलाच्या जातीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने उप-विभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज नामंजूर केला. त्या निर्णयाविरुद्ध मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलाच्या वतीने ॲड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.


यापुवीं लागू केली आईची जात


यापूर्वी उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये पीडित अपत्यांना आईची जात लागू करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित अपत्यांचाही त्यांच्या वडिलांशी काहीच संपर्क नव्हता. करिता, उप-विभागीय अधिकाऱ्यांचा वादग्रस्त आदेश रद्द करून या मुलाला आईच्या कागदपत्रांवरून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे, असे ॲड. ढवस यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले.


MNS Vidarbha : राज ठाकरे तब्बल 6 दिवस विदर्भ दौऱ्यावर, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात आखणार रणनिती


अपहरणकांडात आणखी एकाला अटक


नागपूर: जरीपटक्यातील महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मोतिरामानी यांच्या अपहरण कांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. जॉय रॉड्रिक्स (30) रा. पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या 4 झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी रिना डॉम्निक फ्रांसिस, नोएल उर्फ सन्नू हेन्ड्री फ्रांसिस आणि सूरज फालकेला अटक केली होती. जॉय फरार झाला होता. पोलिस सतत त्याचा शोध घेत होते. प्रदीपचे अपहरण करताना जॉयचे वाहन चालवत होता. सोमवारी तो पोलिसांच्या हाती लागला. नोएल, रिना आणि सूरज यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. 


Nagpur Central Jail : डोंगर पोखरुन, उंदीर काढला, तब्बल साडे तीनशे पोलीसांनी टाकलेल्या धाडीत फक्त पाच ग्राम गांजा जप्त