Cough Syrup Death: भेसळयुक्त कफ सिरपमुळे (Cough Syrup) मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा (chhindwara) जिल्ह्यातील एका 4 वर्षीय बालिकेचा नागपूरच्या (Nagpur) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मृत्यू पावलेल्या बालकांची एकूण संख्या आता 18 वर पोहोचली आहे.
Cough Syrup Death: प्रकृती खालावल्याने उपचारासाठी दाखल, पण दुर्दैवी मृत्यू
चार वर्षीय चिमुकलीची तब्येत खालावल्यामुळे तिला 14 सप्टेंबर रोजी नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल महिना भर ती उपचाराखाली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही, गेले काही दिवस तिची प्रकृती पुन्हा खालावत गेली आणि काल (15 ऑक्टोबर) तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेली ही 18 वी केस असून, सर्व मृत बालके मध्यप्रदेशातील आहेत.
Cough Syrup Death: हे 2 कफ सिरप चुकुनही मुलांना देऊ नका
दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने नुकतीच एक हेल्थ अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार भारतात तयार करण्यात आलेल्या 3 खोकल्याच्या सिरपचा वापर आणि वितरण थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. WHO ने ज्यांच्यावर बंदीची शिफारस केली आहे त्या सिरप आहेत, कोल्ड्रिफ (Coldrif), रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ (Relife). ही औषधे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा, आणि शेप फार्मा यांनी तयार केली होती. तपासात या सिरपच्या काही बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol - DEG) हे विषारी रसायन प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहे. हे रसायन मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान, मेंदूवर परिणाम आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मृत्यूपर्यंत धोका निर्माण करू शकते. त्यामुळे WHO ने जागतिक आरोग्य संस्थांना आणि तज्ज्ञांना विनंती केली आहे की, या कंपन्यांनी डिसेंबर 2024 नंतर तयार केलेल्या सर्व औषधांची काटेकोर तपासणी करावी, आणि तपासणीशिवाय कोणतेही औषध बाजारात विकले जाऊ नये याची काळजी घ्यावी.
काय काळजी घ्याल? (Madhya Pradesh Cough Syrup)
- तज्ञ सांगतात, खोकला आला तरी घाबरून जाण्याची गरज नाही. तो 5 ते 7 दिवसांत स्वतःहून बरा होऊ शकतो, फक्त तुमच्या मुलाला थंडीपासून दूर ठेवा.
- तीव्र खोकल्यासाठी हनीटोस कफ सिरप आणि तापासाठी पॅरासिटामॉल लिहून दिले जाते. म्हणून, बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
- खोकल्याचे दोन प्रकार आहेत: कोरडा खोकला आणि ओला खोकला. दोन्हीसाठी वेगवेगळी औषधे आणि उपचार आहेत. जर खोकला दम्यासारख्या वायुमार्गातील अडथळ्यामुळे होत असेल तर खोकला दाबण्याऐवजी, अडथळा दूर करण्यासाठी काम केले पाहिजे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा