नागपूरः हरीत अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी आणि शिक्षणाद्वारे त्यावर मंथन करण्याच्या उद्देशाने नागपुरात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहा युरोपीय देश आणि तीन आशियाई देशांतील नामांकित विद्यापीठांतील सुमारे 35 प्रतिनिधी सहभागी होणार आहे. यापैकी काहींचे आगमन नागपुरात झाले असून उर्वरित मान्यवरांचे आगमन उद्या सकाळपर्यंत होणार असल्याची माहिती प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि नॅशनल एन्विरॉन्मेंटल इंजिनीरिंग रिसर्च इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील तीन देशांमध्ये 'हरित अर्थव्यवस्था वाढवणे' या बॅनर अंतर्गत या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन उद्या, 24 ऑगस्ट रोजी जलपुरुष म्हणून प्रसिद्ध राजेंद्र सिंग यांच्या हस्ते होईल. प्रगंसी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे सदस्य शैक्षणिक सल्लागार बासेल, स्वित्झर्लंड येथील विद्यापीठाचे वरिष्ठ प्रशासक डॉ. कार्लोस मचाडो, सायप्रस कॅरियकोस जॉर्जिओ ओ.वि.जी विद्यापीठ मॅग्डेबर्ग, जर्मनी जुलिअन हाल्फ यांची उपस्थिती राहील. परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित देशमुख असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक नानोटी यांची उपस्थिती राहील.
Nagpur : भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन 29 सप्टेंबर रोजी, राज्यपाल, सरसंघचालक यांची प्रमुख उपस्थिती
आव्हानांवर चर्चा अन् समाधानही
या परिषदेत विविध देशातील नामांकित विद्यापीठाच्या प्रतिनिधींसोबतच आचार्य पदवी आणि एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. परिषदेत शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्ह क्षेत्रातील येणाऱ्या आव्हानांवर चर्चा होणार असून त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवरही भर देण्यात येणार आहे. परिषदेत शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि व्यावसायिकांनीची उपस्थिती राहील. दोन दिवसीय परिषदेच्या तांत्रिक सत्रांदरम्यान, शाश्वततेसाठी ग्रीन इनिशिएटिव्हजवर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामवंत शास्त्रज्ञ / संशोधक आमंत्रित चर्चा करणार असून सुमारे 150 सदस्य सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. आयोजन समितीमध्ये प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाते. उप प्राचार्य डॉ. जी. एम. आसुटकर, संयोजक डॉ सुमित राव, डॉ. मंजू सोनी, संघटन सचिव डॉ. मयुरी चांडक, डॉ. वैशाली सोमण, डॉ. प्रशांत आडकिने, सतीश तिवारी यांचा समावेश आहे.