Nagpur News : पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या नागपुरातील महिलेचा धक्कादायक खुलासा; पाकिस्तानी ख्रिश्चन धर्मगुरूने दिला होता 'हा' सल्ला
Nagpur News : पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी (LOC) ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगडे (Sunita Jamgade) संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

Nagpur News : पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी (LOC) ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगडे (Sunita Jamgade) संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातून पाकिस्तानला जाण्यासाठी सुनीताने सर्वात आधी अटारी बॉर्डर पार करून जाण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही वेळी तो अपयशी ठरला. दरम्यान, अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात (India-Pakistan) घेता येईल, असा सल्ला देणारा व्यक्तिचे नाव समोर आले असून हा सल्ला सुनीताला एका पाकिस्तानी ख्रिश्चन धर्मगुरू ने दिला होता. तो तिला भारतातील एका धार्मिक कामासाठी तयार करण्यात आलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर भेटला होता. असा दावा सुनीता जमगडे हीने केला आहे. त्यामुळे भारतातील धार्मिक व्हाट्सअप ग्रुपवर पाकिस्तानातील ख्रिश्चन धर्मगुरू का आणि कोणत्या हेतूने जोडला गेला होता? याचा तपास ही तपास यंत्रणा करत आहेत.
ख्रिश्चन धर्मगुरू ने दिला होता एलओसी ओलाडण्याचा सल्ला
पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या सुनीताच्या मुलाला काश्मीरमधून नागपूरात आणले आहे. सुनीता 14 मे रोजी कारगिल परिसरातून एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मिरच्या भागात गेली होती. त्यानंतर तिचा मुलगा कारगिलमधील बालकल्याण समितीच्या ताब्यात होता. या दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला नागपूरात आणण्यात आले आहे. दरम्यान सुनिताने कोणत्या पाकिस्तानी नागरिकाची भेट घेण्यासाठी एलओसी ओलांडली होती, याबद्दल ती नागपूर पोलिसांची सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तर देत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी नागपूरची सुनीता कारगिल जवळ LOC ओलांडून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. 14 मे रोजी एलओसी ओलांडताच पाकिस्तानी रेजर्सने तिला पकडून त्याची चौकशी केली आणि 2 दिवसांनी तिला भारतीय बीएसएफच्या हवाली केले होते. त्यानंतर सध्या ती नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.
सुनीता जमगडेची पोलीस कोठडी आज संपणार
अशातच आता जुल्फिकार नावाचा खरंच कोणी व्यक्ती आहे का? की तो पाकिस्तानी एजन्सीचा बनावट सोशल मीडिया अकाउंट आहे? यास तपास भारतीय तपास यंत्रणा करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून पोलीस आणि तपास यंत्रणा त्या दिशेने तपास करत आहेत. दुसरीकडे सुनीता जमगडे या महिलेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असता तिला 2 जूनपर्यंत म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















