Nagpur Violance News Update : नागपूर शहराच्या महाल परिसरात 17 मार्च रोजी दोन गटात झालेल्या तूफान राडा आणि दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. या हिंसाचार प्रकरणाबाबत (Nagpur Violance) आता नवी माहिती समोर आली आहे. नागपूर हिंसाचार (Nagpur Riots) घटनेतील 9 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या 9 आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांवर जामीन मंजूर केलाय. 17 मार्चला नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार आणि जाळपोळीची घटना झाली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी 13 विविध एफआयआर नोंदवीत शंभरावर आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणाचा निकाल देत सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळल्यावर जामिनासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खमंडपीठात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली असून 9 आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
9 आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांवर जामीन मंजूर
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणात या आरोपींचा कुठलाही संबंध नसल्याचे युक्तिवाद आरोपींच्या वकिलानी कोर्टात केला. आज या जामीन प्रकरणावर सुनावणी करीत दंगलीत सहभाग असल्याचा आरोप असलेल्या 9 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केलाय. यात इकबाल अंसारी, एजाज अंसारी, अफसार अंसारी, इजहार अंसारी, अशफाकउल्ला, मुज्जमिल अंसारी, मोहम्मद राहिल, इफ्तेखार अंसारी, मोहम्मद यासिर यांना कोर्टाने जामीन मंजूर केलाय.
तर दुसरीकडे, या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला मोहम्मद फहिम खान(Faheem Khan) आणि इतर आरोपी हे अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. फहीम खानवर असलेले आरोप आणि पोलिसांचा सुरु असलेला तपासाची स्थिती बघता न्यायालयाने जामीन द्यायला नकार दिला आहे. 17 मार्चला नागपूर मध्ये हिंसाचार घडला आणि 18 मार्चला फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. सध्या फहीम खान हा नागपूर कारागृहात आहे. दरम्यान त्याने केलेल्या जमीन अर्जावर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देऊन हा अर्ज फेटाळून लावला आहे.
प्राध्यापकाला ‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून फसवणूक
वसई पश्चिम येथील 63 वर्षीय निवृत्त प्राध्यापक संतोष अच्युत शेंडे सायबर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवरून ‘TRAI’ आणि ‘पोलिस खटल्याची’ बनावट भीती दाखवत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडून फसवणूक केली. फसवेखोरांनी शेंडे यांना सांगितले की, त्यांच्या आधार कार्डाचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे. जर त्यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही, तर त्यांना थेट घरी जाऊन अटक केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली.
या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात BNS 2023 मधील कलम 319(2), 318(4), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C), 198(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा क्रमांक 188/2025). आरोपी अद्याप फरार असून, पोलीस तपास सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
