Nagpur Teachers Protest : शिक्षकांचा विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथील यशवंत स्टेडियम या ठिकाणी आठ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांनी (Teachers Protest) सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यातील काही आंदोलनकर्त्या शिक्षकांची (Teachers) प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. तर दुसरीकडे इतर शिक्षक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. शिक्षकांनी यशवंत स्टेडियम या ठिकाणी लोटांगण घालायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांच्या (Nagpur Police) वतीने शिक्षकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. यात 7 ते 8 आदोलनकर्ते शिक्षक बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वातावरण थोडं शांत असलं तरी शिक्षकांच्या या आदोलनामुळे पोलिसांना काहीशी कसरत करावी लागली आहे.

Continues below advertisement

Nagpur Teachers Protest : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण; 622 शिक्षकांचे 10 महिन्यांपासून वेतन राखडलं

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांच सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे. शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर 10 महिन्यापासून शिक्षकांचं पगार नसल्याने नागपुरात मागील 7 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलंय. शालार्थ आयडी प्रकरणामुळे नागपूर जिल्ह्यातील 622 शिक्षकांचे मागील 10 महिन्यांपासून वेतन रखडले असून, यासंदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही वेतन अदा करण्यात आलेले नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटचा दिवस असताना अगदी सकाळपासून शिक्षकांनी यशवंत स्टेडियम या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. आज तरी याबाबत ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा आंदोलकर्ते शिक्षकांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

Protest : मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर आज पुन्हा लोटांगण घालू आंदोलन करू

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण घातलं होतं. त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता. पोलिसांनी त्यांच्या 28 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झाले असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचा नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या