Nagpur News : मोठी बातमी! पाकिस्तानातून नागपुरात परतलेल्या सुनीताची NIA सह काश्मीर पोलिसांकडून ही चौकशी
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या सुनीताची चौकशी करता काश्मीर पोलीस नागपुरात दाखल झाले आहे आहेत. दरम्यान, या महिलेला काश्मीर पोलीस तपासाकरता काश्मीरला ही घेऊन जाऊ शकतात, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Nagpur News : पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी (LOC) ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगडे (Sunita Jamgade) प्रकरणासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. भारताची सीमा पार करत पाकिस्तानात गेलेल्या सुनीताची चौकशी करता काश्मीर पोलीस नागपुरात दाखल झाले आहे आहेत. दरम्यान, सुनीता जमगडे या महिलेला काश्मीर पोलीस तपासाकरता काश्मीरला ही घेऊन जाऊ शकतात, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी कोर्टाच्या आदेशानंतर प्रोडक्शन वॉरंट घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, सुनिताने गुगल मॅपच्या मदतीने एलओसी क्रॉस (India-Pakistan) केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. त्यामुळे सुनिता जामगडेचा मोबाईल सध्या तपासण्यात येत आहे. मात्र त्यात मालवेअर असल्याच्या शक्यतेने सायबर टीम काळजीपूर्वक मोबाईलचा तपास करत आहे. या दरम्यान सुनीता दोन लोकांच्या संपर्कात होती. त्यांपैकी एक जुल्फीकार नावाचा व्यक्ती होता.
सुनीता नागपुरातून 4 मे रोजी काश्मीरला फिरायला जात आहे, असं सांगून नागपुरातून घरून निघाली होती. त्यानंतर 14 मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की मुलाला सोडून ती पाकिस्तानला गेली. त्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने तिला बीएसएफकडे सुपूर्द केले. बीएसएफकडून महिलेला ताब्यात घेतल्यानंतर अमृतसर पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर नागपूरात आणण्यात आले. सध्या या प्रकरणी राष्ट्रीय एजन्सी ही तपास करत आहे.
NIAचे अधिकारी ही करणार सुनिताची चौकशी
एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनिताची चौकशी NIA चे अधिकारी ही करणार आहे. 28 मे पासून नागपूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सुनीताने नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान फारसे सहकार्य केले नसल्याची माहिती असून आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. तपास यंत्रणांना शंका आहे की स्थानिक मदतीशिवाय सुनीता अवघ्या काही तासात एलओसी क्रॉस करून पाक व्याप्त काश्मीरमध्ये एवढ्या आतपर्यंत जाऊ शकत नाही.
तिला काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर कोणी मदत केली याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. विशेष म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलाला कारगिल जवळ सोडूनच सुनीताने एलओसी क्रॉस केली होती. कालच काश्मीरमधील बालकल्याण समितीच्या ताब्यातून संबंधित बालक नागपुरात आपल्या कुटुंबात पोहोचला होतं.
इतर महत्वाच्या बातम्या



















