Nagpur News : अमेरिकेच्या शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) हे भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मान्यता मिळालेले पहिले अमेरिकन विद्यापीठ बनले आहे. अशातच या विद्यापीठाने जगभरातल्या प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये भारतातील नागपूरच्या शहाना फातिमाची निवड करण्यात आली आहे. शहानाच्या सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तिची ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरच्या शहाना फातिमाने सायबरसुरक्षा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत थेट शिकागोत ठसठसीत यशाची मोहर उमटवल्याचे बोलले जात आहे.
युरोपमधील कोसोवो येथेही विशेष कामाची संधी
पुढे आलेल्या माहितीनुसार, शिकागोच्या इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात शहाना फातिमाने मास्टर डिग्री मिळवली आहे. सोबतच प्रथम श्रेणी आणि विशेष प्रावीण्यासह तीने ही पदवी प्राप्त केली आहे. 2024 मध्ये तिला युरोपमधील कोसोवो येथे एक महिना घालवण्याची संधी मिळाली होती. तिथे तिने कोसोवोची राजधानी प्रिस्टिना येथील थ्री फोल्डर्स या मार्केटिंग कंपनीसाठी संपूर्ण सायबरसुरक्षा पायाभूत सुविधा, डिझाइन करून ती कार्यान्वित केली होती.
पाच इलिनॉय टेक विद्यार्थ्यांच्या टीमला कोसोवर मार्केटिंग स्टार्टअप कंपनीसाठी एक व्यापक सुरक्षा उपाय डिझाइन करून ते कार्यान्वित करण्याचे काम देण्यात आले होते. या कामात सायबर हल्ला किंवा त्या संदर्भातील शोध प्रणाली आणि फायरवॉल तयार करण्याचे महत्वपूर्ण काम देण्यात आले होते. या बाबत बोलताना ती म्हणाली होती की, कोसोवोमधील इंटर्नशिप हा इलिनॉय टेकमधील अनेक अनुभवांपैकी एक आहे. ज्यामुळे मला पीएच.डी. प्रोग्रामची तयारी करण्यास मदत झाल्याचे तीने सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दातून प्रेरणा
दरम्यान, सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? असा प्रश्न शहाना फातिमा हीला विचारला असता ती म्हणाली की, काही वर्षांपूर्वी नागपूर येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "एक काळ असा होता जेव्हा ज्या राष्ट्रांकडे इंधनाचे साठे होते ते समृद्ध मानल्या जात होते, पण आता ज्यांच्याकडे डेटाचे साठे असतील ते देश समृद्ध होतील." हे ऐकून या क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे शहानाने सांगितलं. तर माझ्या करिअरला आकार देण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक्स तज्ज्ञ डॉ. रिझवान अहमद यांनी मार्गदर्शन केल्याचे ती सांगते.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI