Nagpur News : नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; नियम मोडणाऱ्यावर 10 हजाराचा दंड, वाचा सविस्तर
Nagpur Traffic Rules : नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. नागपूर शहरात वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंदी असणार आहे.

Nagpur Traffic Rules : नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. नागपूर शहरात वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंदी असणार आहे. नागपूर पोलीसांनी याचे परिपत्रक काढले असून 7 सप्टेंबरपासून हा आदेश लागून होणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, नवीन नियमावली नुसार दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांना आऊटर रिंग रोडचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तर नियमाचे उल्लंघन केल्यास 10 हजाराचा दंड थोटवण्यात येणार आहे. नियमाची अंबलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस विभागाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. नागपूर शहरात मागच्या पाच वर्षात जड वाहनांनी 457 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या नव्या नियमामुळे अपघाताच्या घटनांना आळा बसतो का आणि वाहतूक कोंडीची समस्या आटोक्यात येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्डात आणखी एका तरुणाचा मृत्यू
मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. देवांश पटेल असे मयत तरुणाच नाव असून तो जोगेश्वरीचा रहिवासी आहे. तर या अपघातात स्वप्नील विश्वकर्मा हा जखमी झाला आहे. लालबागच्या राजाचे दर्शन करून देवांश आणि त्याचे मित्र स्कुटीवरून घराकडे जात होते. मात्र पवईजवळ आयआयटी गेटजवळ एक खड्डा आणि त्याच्या बाजूला असलेल्या उंचवट्यामुळे त्याची स्कूटी स्लिप झाली आणि तो बाजूने जाणाऱ्या बेस्टच्या बस खाली आला. यात देवांशचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा हा जखमी आहे. मात्र या खड्ड्याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करून ही तो बुजवला गेला नाही. काहीच महिन्यापूर्वी इथून काही अंतरावर लालू कांबळे या व्यक्तीचा अगदी असाच मृत्यू झाला होता. मात्र प्रशासनाला जाग आलेली नसल्याने हा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
अपघातानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस विभागाने या घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तत्परतेने ती सुरळीत केली. दरम्यान, ही घटना शहरातील वाढत्या अपघातांची आणि वाहतुकीची गंभीर समस्या अधोरेखित करत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ते सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हे देखील वाचा:

























