Nagpur News: नागपुरातील पारडी शिवरामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या मिळून आलेला नाही. दरम्यान, त्याच बिबट्याने आज पहाटे दोन पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन ते तीन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. भरवस्तीत अचानक बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठा पोलीबंदोबस्त (Nagpur Leoprad Rescue Operation) तैनात करण्यात आला आहे. सोबतच परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमानात गर्दी झाली आहे.

Continues below advertisement

Nagpur Leoprad : नागरिकांमध्ये भीतीच वातावरण, चौघांवर रुग्णालयात उपचार

नागपूरच्या शिवनगर परिसरात दाटलोक वस्तीमध्ये बिबट शिरल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सध्या बिबट वर्मा कुटुंबीयांच्या घरी लपून बसला असल्याची माहिती आहे. सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले असून चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वनविभाग तसेच पोलिसांनी बिबट लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला आहे. मात्र बघ्यांची मोठी गर्दी आणि सातत्याने केल्या जाणारा आवाज यामुळे बिबट्याला पकडण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र वन विभागाची रेस्क्यू टीम उशीरा स्पॉटवर पोहोचली सल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

Nagpur Leoprad Rescue Operation : वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

दरम्यान, सध्या वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला ट्रॅक्युलाईज करण्यासाठीची तयारी सुरू केली. त्यासाठी वन विभागाचे वैद्यकीय तज्ञ आवश्यक सह डार्टची तयारी करत आहे. दुसऱ्या बाजूला वन विभागाचे पथक बिबट लपून बसलेल्या पांढऱ्या घराच्या मुख्य दाराला जाळी बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बिबट त्या ठिकाणातून निसटणार नाही यासाठी ही जाळी बांधली जात आहे.

दुसरीकडे नागपुरात बिबट्यानं आणखी एक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील परमात्मा आश्रम परिसरात गोठ्यात बांधलेल्या गुरावर बिबट्याने हल्ला केल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. तर वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या