एक्स्प्लोर

Nagpur Crime News : आतापर्यंत 8 लग्न, एकही नवऱ्याकडून घटस्फोट नाही; मॅट्रिमोनिअल साईट्सवरून 'लुटेरी दुल्हन'चा अनेकांना लाखोंचा गंडा

Nagpur Crime News : मॅट्रिमोनिअल साईट्सवरून अनेकांना गंडा घालणाऱ्या 'लुटेरी दुल्हन' नामक महिलेचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड करत तिला अटक केली आहे.

Nagpur Crime News : आजपर्यंत आपण 'लुटेरी दुल्हन' नावाने चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये असं एखादं पात्र पाहिलं असेल. पण अशीच ऐखादी खरी आणि वास्तविक कहाणी जर तुम्हाला सांगितली तर? होय नागपूर शहरातून अशीच एकाखळबळजनक घटना समोर आली आहे. 'लुटेरी दुल्हन' समीराची कथा शादी डॉटकॉमसारख्या मॅट्रिमोनियल साईट्स (Matrimonial website) वरून सुरु होते. याच मॅट्रिमोनियल (Crime News) साईट्सचा वापर करून तिने अनेक पुरुषांना फसवलं. ती श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्तींना टार्गेट करत स्वतःला ‘घटस्फोटित’ असल्याचं सांगते आणि लग्न करायची इच्छा व्यक्त करत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवते. शिवाय लग्न झाल्यावर थोडा काळ संसाराचा अभिनय केला कि मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंगचं सत्र. या यादीतील अशीच एक पीडित व्यक्ती आहे गुलाम पठाण. त्यांनी आपल्यावर घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला असूनखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे हि घटना घडली आहे.

आतापर्यंत 8 लग्न, एकही नवऱ्याकडून घटस्फोट नाही

दरम्यान, या घटनेतील पीडित पती गुलाम पठाण यांनी सांगितले की, तिने गेल्या 2010 पासून अनेक पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. लग्नानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची. नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची. तिने आतापर्यंत 8 लग्न केले. महत्वाचं म्हणजे तिने एकही नवऱ्याकडून तिचा घटस्फोट घेतला नाही.

आतापर्यंत 50 लाखा रुपयाची फसवणूक

पुढे आलेल्या माहितीनुसार, समीरा एका शाळेत शिक्षिका आहे आणि नवीन लोकांशी बोलायची तेव्हा त्यांना माझा घटस्फोट झालेला आहे, अशी खोटी माहिती ती द्यायची. त्यानंतर पुरुषांना आपल्यावर अत्याचार होत आहे, असं सांगत ती म्हणायची की मला तुमचा सहारा द्या. मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील, असं म्हणत ती मुस्लिम पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर लग्न करायला लावायची आणि पैसे वसूल करायची. तिने आतापर्यंत 50 लाखा रुपयाची फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे. या पीडित पुरुषांमध्ये हँडलूम व्यावसायिक, शिक्षक, कंपनी मॅनेजर, बँक मॅनेजर मोहम्मद तारीक अनिस, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अमानुल्ला खान, आणि रिअल इस्टेट व्यावसायिक यांचा समावेश आहे.

समीराला अटक, इतर गुन्हेगारीचा इतिहास उघड होण्याची शक्यता

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता या प्रकरणी गुन्हा दाखल करत समीराला अटक केली आहे. मात्र अजून किती जण या ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यामुळे समीराचा गुन्हेगारी इतिहास अजूनही उघड होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 April 2026: आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
LPG Crisis : होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांना जाण्याची परवानगी,  इराणने घातल्या कडक अटी, पुरवठा साखळीवर परिणाम
LPG Crisis : होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांना जाण्याची परवानगी,  इराणने घातल्या कडक अटी, पुरवठा साखळीवर परिणाम
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget