Nagpur Crime News : नागपूर शहरातूनएकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यातशहरातील कळमना परिसरात अवैध्य रित्या सुरु असलेल्या डान्सबार वर गुन्हे शाखेनेसापळारचतमोठी कारवाई (Crime News) केलीआहे. जुनी कामठी रोडवरील शिवशक्ती बारमध्ये परराज्यातून आलेल्या मुली तोकड्या कपड्यावर डान्स करायला आणि दारू सर्व्ह करायला असल्याची माहिती नागपूर पोलीसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाला मिळाली. यामाहितीच्याआधारेपोलिसांनी सापळा रचत हि कारवाई केलीय. त्यानंतर या कारवाईत 21 ग्राहकांसह 25 लोकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतअसूनयाघटनेनेमात्रशहरातएकचखळबळउडालीआहे.
मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार
दरम्यान, असाचएकप्रकार नाशिक शहरातघडल्याचेउघडझालेआहे. नाशिक शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचेसमोरआलंआहे. यातप्रकरणी कुंटणखाण्यावर छापा टाकत 5 पिडीत मुलींची सुटका करण्यातआलीआहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. ज्यामध्ये मुंबईनाका हद्दीत 'आरंभ स्पा' नावाच्या स्पा सेंटरमध्ये पोलिसांचा छापा टाकून हि मोठी कारवाई केलीआहे.
कुंटणखाण्यावर छापा टाकत 5 पिडीत मुलींची सुटका
मिळालेल्यामाहितीनुसार, देहव्यापार चालविणारी महिला खुशबु परेश सुराणा हिला ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. तरयात कानपुर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यातून तसेच नाशिकमधील एक महिला अशा 5 पिडीत मुली मिळून आल्याची माहिती समोरआलीआहे. यापुर्वी देखील आरोपी महिला खुशबु परेश सुराणा विरूध्द पिटा व पोस्को कायद्याने गुन्हे दाखल असल्याचेपोलीसतपासातपुढेआलेआहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशीसाठी एसआयटीचीस्थापना
राज्यातगाजतअसलेल्यानागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यासाठी एसआयटीच्यासंदर्भात राज्य सरकारने परवानगी दिलीआहे. नागपूरमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटीच आता राज्यभर शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा यांनी हा आदेश काढला आहे. नागपूरचे पोलीस उप-आयुक्त नित्यानंद झा हेया एसआयटीचे प्रमुख आहेत. तर नागपूरच्या बाहेर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शालार्थ आयडी घोटाळ्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून यात तीन शिक्षण उप-संचालक, तीन शिक्षणाधिकारी, एक वेतन अधिक्षक, चार संस्थाचालक, दोन मुख्याध्यपक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
