Nagpur News : नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला गो-अराउन्डचा कॉल घ्यावा लागला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना नागपूर विमानतळावर लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला हा निर्णय घ्यावा लागलाय. काल (19 जुलै) सकाळी 7 वाजता नागपूरमध्ये धुक्यांची दाट चादर होती. त्यावेळी नागपूर विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) मुंबई-नागपूर आणि बंगरुळु-नागपूर हे विमाने लँड होणार होती. मात्र लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने विमानाने परत अवकाशात झेपावली. दरम्यान, यावेळी अहमदाबाद विमान अपघाताची आठवण करत प्रवाशांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र दोन्ही विमानांनी 20 मिनिटे हवेत घिरट्या मारल्या आणि दृश्यमान नीट झाल्यानंतर दोन्ही विमानांनी सुखरूप लँडिंग केली. परिणामी प्रवाशांनी ही यावेळी सुटकेचा श्वास घेतला.
नागपूरात वीज पडून दोन महिला ठार, 5 जण जखमी
पाऊस सुरू होण्यापूर्वी वीज पडून झालेल्या घटनेत दोन महिला जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबतच शेतात काम करणाऱ्या इतर 5 महिला जखमी झाल्या. रामटेकजवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली. यात या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगलाबाई जीवन मोटघरे रा. परसोडा, रामटेक व वर्षा देवचंद्र हिंगे रा. भोजापूर, रामटेक असे मृत महिलांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये जयश्री आकाश जवादे , रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर , तिघीही राहणार रामाळेश्वर वॉर्ड रामटेक, कलाबाई कवडू वरघणे , प्रमिला वासुदेव आष्टनकर दोघीही रा. भोजपूर ता. रामटेक यांचा समावेश आहे.
जखमींना महीलांना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रामटेकचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.
इतर महत्वाच्या बातम्या