Solapur News : माढा तालुक्यातील कुर्डू येथे अजितदादांच्या (Ajit Pawar) फोनवरून झालेल्या वादंगानंतरहेप्रकरणचांगलेचचर्चेतआलंआहे. दरम्यान मुरूम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये आता कुर्डू गावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडिराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत दाखल करण्यातआलाआहे. तहसीलदारांची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातिल 120 ब्रास आणि 72 हजारांच्या किंमतीचा मुरुम अवैधरित्या उपसाकरुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यातआलाय.
सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद
मिळालेल्यामाहितीनुसार, गावच्या तलाठी प्रिती शिंदे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानुसार सरपंच आणी ग्रामसेवक या दोघांनी संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद झालीय. माढा महसुल प्रशासनाने दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरुन कुर्डूत तहसीलदारांची अथवा कसलीही शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या मुरुम उपसा झाला आहे, हे दाखल झालेल्या तक्रारीवरून आता उघड झाले आहे. त्यामुळे कारवाई रोखण्यासाठीच आयपीएस अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केलेला हे आधोरेखित झाले आहे. रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता. मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्या, परवाना न घेता उत्खनन केलेला होता हे अंतिमरित्या स्पष्ट झाले आहे. शिवाययाप्रकरणी अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे आणि नितीन माळी या चौघांसह गावातील इतर 15 ते 20 लोकांवर 3 सप्टेंबर रोजी सरकारी कामात अडथळा आणणे, हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूम उपसासंदर्भात कुर्डू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच
कुर्डू येथे सुरू असलेला मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी किंबहुना अर्ज देखील देण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरु असल्याचा दावा केला जातोय, त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत ही आधीच संपलेली आहे. एका रस्त्यासाठीची वर्कऑर्डर ऑक्टोबर 2024 मध्ये तर दुसऱ्या रस्त्याची वर्कऑर्डर मुदत ही एप्रिल 2025 मध्ये संपली असल्याचीमाहितीसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयानेदिलीआहे. कुर्डू गावात मुरूम उपसा संदर्भात झालेल्या प्रकरची तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गावातील तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरूम उपसा करावायचे असल्यास त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामासाठी कोणतेही रॉयलटी न घेता परवानगी दिली जाते. मात्र कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील हि माहिती उघडझालीआहे. दरम्यान जिल्हातील अवैध मुरूम, वाळू उपसावरील कारवाई संदर्भत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. या बैठकीत अवैध वाळू, मुरूम उपसा संदर्भात कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जायकुमार गोरे यांनी केल्याची हि माहिती पुढेआलीआहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
