नागपूरः तरुणी ज्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करायची तिथेच तरुणाच्या (love) प्रेमात पडली. त्यातून त्या दोघांचे शारीरिक संबंध झाले. काही काळानंतर तिने प्रियकराकडे (lover) पैशाची मागणी केली. तर आता महागडा आयफोन (Iphone) घेऊन देण्यावरुन त्याला ब्लॅकमेलिंग करणे सुरु केले होते. तिच्या वारंवार धमकावण्याच्या प्रकाराला कंटाळून दुकानदाराने काम करत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत तिला कायमचे संपविले. गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. काटोल  (Katol road) हद्दीतील चारगांव मार्गावरील विटभट्टी समोरील रोडलगत अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी ओळख पटविल्यानंतर खुनाचे बिंग फुटले.


अशी पटली ओळख


मृत युवतीच्या अंगात पिवळ्या रंगाचा टी शर्ट, कमरेत काळ्या रंगाचा पांढरे लांब पट्टे असलेला प्लाजो परिधान केला होता. नाकात पिवळ्या धातूची नथ घातलेली आढळळी. उजव्या हातावर तीन 'स्टार' गोंदलेले दिसून आले. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी काटोल पोलिसांचे व स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करुन वेगवेगळ्या मार्गाने तपास सुरु केला. मृत युवती ही मध्यप्रदेश येथील असण्याची शक्यता असण्याची शक्यता वाटत असल्याने पथकाने मध्यप्रदेशातील पांढुर्णा, बडचिचोली, मुलताई या भागात जावून मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. मुलगीची ओळख पटल्याची माहिती काटोल पोलिस ठाण्याला मिळाली. ग्राम आमळा (जि. बैतूल, मध्यप्रदेश)  (MP) येथील लता अशोक काचेवार यांना चारगांव शिवारातील अनोळखी मृत मुलीचे फोटो दाखविले. फोटो पाहून मृत मुस्कान ही लता कोचेवार यांची मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.


नेहमीच मागायची पैसे


मुस्कान ही आमला येथील क्रिष्णा ज्वेलर्स येथे काम करायची. कामानिमित्त ती बरेचवेळा बाहेरगावी जायची. यावरुन पथकाने क्रिष्णा ज्वेलर्स येथे चौकशी केली असता दुनाकाचा मालक पुनित सुनिल सोनी (वय 28, गणेश कॉलनी, आमला) व त्याच्या दुकानात काम करणारा नोकर विधीसंघर्षग्रस्त बालकाने मुस्कानची हत्या केल्याचे उघड झाले. मुस्कान काचेवार ही 1 वर्षापूर्वी क्रिष्णा ज्वेलर्स या दुकानात कामाला होती. दुकानाचा मालक पुनित व मुस्कान यांच्यात प्रेमसंबंध जुळले. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. मुस्कान याच गोष्टीचा फायदा घेऊन पुनितला पैशासाठी ब्लॅकमेल करायची व नेहमी पैसे मागत असायची. मागिल काही दिवसांपासून तिने पुनितला मोबाईल विकत घेऊन देण्याचा तकादा लावला. याकरीता वारंवार पुनितला त्रास देत होती.


ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून हत्या


मुस्कानकडून होणाऱ्या ब्लॅकमेलींगच्या (Blackmailing) जाचाला कंटाळून पुनित याने त्याच्या दुकानातील विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून मुस्कान हिला संपविण्याचे ठरविले. तिला मोबाईल देण्याच्या बहाण्याने बोलावले. ती आल्यावर पुनित नोकरासह मुस्कान हिला स्वतःच्या वाहनात बसवून आमला येथून नागपूरकडे (Nagpur) निघाला. रस्त्यामध्ये काटोलपासून सुमारे 95 किमी अंतरावर नागपूरच्या दिशेने जात असताना वाहन चारंगाव शिवारातील विटभट्टी रोडच्या बाजूला थांबविले. मुस्कान हिला पुनित व त्याच्या नोकराने जिवे ठार करुन तिचा मृतदेह रोडच्या बाजूला फेकून पळ काढला.


Supreme Court On Bail : जामिनासाठी नवा कायदा असावा, लोकशाहीमध्ये पोलीस राजला स्थान नाही; सुप्रीम कोर्टाने सुनावले