नवी मुंबईत खड्ड्यामुळे पुन्हा एक बळी, क्रेनखाली आल्यानं तरुणीचा मृत्यू
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 15 Oct 2017 11:05 PM (IST)
खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरून जात होती. खड्ड्यामुळं तिचा तोल गेला जाऊन खाली पडली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या क्रेननं तिला चिरडलं. या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला.
नवी मुंबई : खारघर सेक्टरमध्ये काल घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला. या दृश्यानं फक्त अपघातच नव्हे, तर नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दुरवस्थेचं वास्तव समोर आणलं आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरून जात होती. खड्ड्यामुळं तिचा तोल गेला जाऊन खाली पडली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या क्रेननं तिला चिरडलं. या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, यापूर्वीही नवी मुंबईत खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे संतोष शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा खड्डा चुकवताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अपघाताचा भीषण व्हिडीओ पाहा