मुंबई: वरळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. त्यांच्याच सल्ल्यानुसार अपघात झाल्यानंतर मिहीर शाह (Mihir Shah) हा वांद्रे परिसरात गाडी सोडून फरार झाला होता. राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते. त्यामुळे विरोधकांकडून राजेश शहा यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांची शिंदे गटातून (Shivsena Shinde Camp) हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला होता. 


मात्र, संजय शिरसाट यांनी राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी होण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना मिळेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.


अशा प्रकरणांमध्ये कोणाला पाठीशी घातले जात नाही. एकदा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित व्यक्ती कोणाचा मुलगा आहे, हे पाहिले जात नाही. मग तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा असला तरी त्याला अटक केली जाते. कितीही राजकीय दबाव आला तरी एफआयआर बदलता येत नाही. हे प्रकरण हिट अॅड रनचं आहे. ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ते आपली अक्कल पाजळत आहे, असा पलटवार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला.


मिहीर शहाला शहापूरमधून अटक


गेल्या अनेक तासांपासून फरार असलेल्या मिहीर शहा याला मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेने अखेर मंगळवारी शहापूरमधून ताब्यात घेतले. आता त्याची तात्काळ वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेले जाईल. यानंतर मिहीर शहा याची चौकशी केली जाईल. दरम्यान, पोलिसांनी मिहीरला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मिहीरचे कुटुंबीय आणि त्याच्या गर्लफ्रेंडचाही समावेश आहे.


राजेश शहांनी मुलाला वाचवण्यासाठी कशाप्रकारे कट रचला


वरळीत अपघात झाल्यानंतर मिहीरने त्याचे वडील राजेश शहा यांना अटक केली होती.  त्यांनीच मिहीरला तू पळून जा, 'अपघात (Worli Accident) चालकाने केला आहे सांगू, असा सल्ला दिला होता. यानंतर  राजेश शहा यांना मिहीरने ज्या बीएमडब्ल्यू गाडीने वरळीत कावेरी नाखवा यांना चिरडले, ती गाडीच नष्ट करायची होती. जेणेकरुन मिहीर शहा याच्याविरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता.


अपघातावेळी मिहीर गाडी चालवत होता. मात्र राजेश शहा यांनी सर्वप्रथम त्यांचा चालक राजऋषी बिडावत याला अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेण्यास सांगितले. त्यानंतर राजेश शहा घाईघाईने कलानगर येथे पोहोचले. याठिकाणी आल्यानंतर राजेश शहा यांनी फोन करुन एक टोईंग व्हॅन बोलावून घेतली. यादरम्यान राजेश शहा यांनी मिहीरच्या गाडीची ओळख कोणालाही पटू नये, यासाठी गाडीवरची नंबरप्लेट काढून टाकली. राजेश शहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे मिहीरच्या गाडीवर शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाणही होता. ते चिन्हही राजेश शहा यांनी गाडीवरुन झटपट काढून टाकले. यानंतर राजेश शहा टोईंग व्हॅनची वाट बघत असतानाच मुंबई पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने माग काढत गाडीपर्यंत पोहोचले आणि राजेश शहा यांची सगळी योजना फसली. 


आणखी वाचा


लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...