मुंबई : लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यापासून लोकल रेल्वेला काय मिळालं, याची उत्सुकता मुंबईकरांना सर्वात जास्त असते. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाल्यापासून एका पुस्तिकेतून कोणत्या प्रकल्पाला किती निधीची तरतूद करण्यात आली, याची माहिती दिली जाते. ही माहिती देणारं पिंक बुक आज मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळालं. अंतरिम अर्थसंकल्पात मध्य आणि पश्चिम रेल्वेला ज्या गोष्टी दिल्या गेल्या होत्या, त्यात जास्त बदल न करता निधीमध्ये थोडीशी फेरफार करण्यात आली आहे.
एकूण मिळालेला निधी -
मध्य रेल्वे – 7955 कोटी
पश्चिम रेल्वे – 6346 कोटी
रेल्वे अर्थसंकल्पात महत्त्वाचं काय?
- बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 10 हजार कोटी
- मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गावर 160 ते 200 किमी वेगापर्यंत सक्षम करण्यासाठी 500 कोटी
- विरार-अंधेरी धीम्या मार्गावरील 15 डब्यांच्या लोकलसाठी 12 कोटी
- बेलापूर-सीवूड-उरण मार्गासाठी एकूण 1764 कोटींपैकी 154 कोटी
- विरार ते चर्चगेट दरम्यान पादचारी पूल बांधायला 47 कोटी
- जोगेश्वरीत दुसरं टर्मिनस उभारण्यासाठी 10 लाख
- बांद्रा स्टेशनचा हेरिटेज म्हणून संवर्धन करण्यासाठी 5.52 कोटी
- विरार ते चर्चगेट नवीन ट्रॅकसाठी 23.3 कोटी
- नेरळ-माथेरान राणीसाठी 3.07 कोटी
- कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी एकूण खर्च 913 कोटींपैकी 160 कोटींची तरतूद
- लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये क्षमता वाढवण्यासाठी 7 कोटी
- सीएसएमटी फलाट क्रमांक 10 ते 13, 24 डब्यांच्या ट्रेनना वापरण्याजोगे करण्यासाठी 4 कोटी
- दिवा आणि विक्रोळी येथील रोड ब्रिजसाठी एकूण 10 कोटी
- मध्य रेल्वेवरील एमयू, मेमू आणि डेमू गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी 5 कोटी, सरकते जिने 28 कोटी आणि संरक्षक भिंत बांधायला 12 कोटी
मुंबई रेल्वे प्रवासी सुविधा -
एकात्मिक सुरक्षा यंत्रणा - 20 कोटी
सरकते जिने - 5.3 कोटी
लिफ्ट - 5.1 कोटी
तिकीट यंत्रणा - 4.15 कोटी
इतर सुविधा - 62.62 कोटी
एमआरव्हीसीच्या प्रकल्पांना मिळालेला निधी
एमयूटीपी – 2
एकूण - 244.92 कोटी
प्रकल्प -
मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग
ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग
एमयूटीपी – 3
एकूण - 283.78 कोटी
प्रकल्प -
47 वातानुकूलित लोकल
विरार-डहाणू मार्ग
पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग
ऐरोली-कळवा उन्नत मार्ग
एमयूटीपी 3 अ
एकूण - 50 कोटी
प्रकल्प -
210 वातानुकूलित लोकल
गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तारीकरण
कल्याण-आसनगाव चौथा मार्ग
कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग
कल्याण यार्ड आधुनिकीकरण
याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुंबई सोडून मिळालेला निधी
- मध्य रेल्वेला लातूर कोच फॅक्टरीसाठी 200 कोटी
- मध्य रेल्वेला प्रवासी सुविधांसाठी 284 कोटी
- पश्चिम रेल्वेला 12,756 कोटी नवीन रेल्वेमार्ग, रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलण्यासाठी, स्टेशन पुनर्विकास, शौचालय, ट्राफिक फॅसिलिटी, सोलर पॅनल अशा वेगवेगळ्या कामासाठी
- पश्चिम रेल्वेला 637 कोटी रेल्वे मार्गावरील ब्रिज, रेल्वे मार्गाखालील रस्ता, अशा कामांसाठी
- पश्चिम रेल्वेला प्रवासी सुविधांसाठी 284 कोटी
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय?
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Jul 2019 11:02 PM (IST)
अंतरिम अर्थसंकल्पात मध्य आणि पश्चिम रेल्वेला ज्या गोष्टी दिल्या गेल्या होत्या, त्यात जास्त बदल न करता निधीमध्ये थोडीशी फेरफार करण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -