बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर लैंगिक अत्याचारांपासून 18 वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने 2012 मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा सध्या चर्चेत आहे. बदलापूरच्या घटना ताजी असतानाच अशा अनेक घटना महाराष्ट्र भरातून समोर येताय. पालकांना वेदना होतायत. आमच्या लेकी सुरक्षित कशा होणार, सोकावलेल्या सैतानांना कायमची अद्दल कशी आणि कोण घडवणार त्यासाठी हा कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? कशाप्रकारची शिक्षा देण्यात येते? या संदर्भात कायदेतज्ज्ञ अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे.