Western Railway Mega Block : येत्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे 24 आणि 25 जानेवारी रोजी रात्री पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या दोन रात्री मिळून पश्चिम रेल्वेच्या 277 लोकल रद्द करण्यात येणार आहेत.या दरम्यानच्या 4 एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान मिठी नदीवर असलेल्या स्क्रू ब्रीजची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शुक्रवारी 24 जानेवारी आणि शनिवारी 25 जानेवारीच्या रात्री हे मेजर मेगा ब्लॉक असणार आहेत. हा ब्लॉक जलद तसेच धीम्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर एक-एक दिवस घेण्यात येणार आहे.
मिठी नदीवर असलेला हा स्क्रू फाउंडेशन ब्रीज भारतातला शेवटचा ब्रीज आहे. याची उभारणी ब्रिटिशांनी केली होती. ब्लॉक कालावधीत उपनगरीय तसेच मेल एक्सप्रेसवर परिणाम होणार आहे. पहिल्या ब्लॉक कालावधीत म्हणजेच 24 तारखेला रात्री सुमारे 127 उपनगरीय सेवा रद्द राहतील आणि 60 सेवा अंशतः रद्द राहणार आहेत. तर दुसऱ्या ब्लॉक कालावधीत म्हणजे 25 तारखेला रात्री सुमारे 150 उपनगरीय सेवा रद्द राहतील आणि 90 सेवा अंशतः रद्द राहतील.
या दोन्ही दिवसांमध्ये 4 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत, तर 10 शॉर्ट टर्मिनेट किंवा ओरिजिनेट आणि 20 गाड्या रिशेड्युल किंवा रेगुलेट करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ही माहिती दिली.
Western Railway Mega Block : असा असेल ब्लॉक?
24 आणि 25 जानेवारी म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार अप आणि डाउन धीम्या मार्गांवर रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत आणि डाउन फास्ट मार्गावर रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ब्लॉक असेल.
त्याचप्रमाणे, 24 आणि 25 जानेवारी म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार अप आणि डाउन धीम्या आणि डाउन जलद मार्गांवर रात्री 11 ते सकाळी 8.30 पर्यंत आणि अप जलद मार्गावर रात्री 11 ते सकाळी 7.30 पर्यंत ब्लॉक असेल.
पहिल्या ब्लॉक कालावधीत विरार, भायंदर आणि बोरीवली वरून निघणाऱ्या धिम्या गाड्या सांताक्रुज़ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट लाइन वर चालविलेल्या जातील. त्यामुळे खार रोड, माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्टेशन वर लोकल थांबणार नाही.
ही बातमी वाचा: