विरार : राज्यभर सुरु असलेल्या पावसाचा फटका विरारमधील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराला बसला आहे. मंदिराच्या 61 फुटी मानक स्तंभावर वीज कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे.


विरार पूर्व महामार्गावरील शिरसाड गावात श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पुण्योदय तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात मागच्याच वर्षी 61 फुटांचं मानक स्तंभ उभारलं होतं. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने हा स्तंभ 50 टक्के कोसळला.

स्तंभाला चारही बाजूने असलेल्या श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री संभवनाथ आणि श्री अभिनंदन नाथ या दहा फुटी देवतांच्या संगमरवरी मूर्तीही तुटल्या आहेत. तसंच स्तंभाच्या संरक्षक भिंतींना तडा जाऊन त्याही कोसळल्या आहेत.

वीज कोसळली तेव्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने, मंदिरातील सर्व कर्मचारी भोजनशाळेत होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही