मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडीस अडथळा ठरणाऱ्या विलेपार्ले पूर्व स्टेशनकडे जाणाऱ्या श्रद्धानंद रोडवरील 18 घरांवर पालिकेनं बुलडोजर फिरवला आहे. या 18 घरांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होत होती. मोठा अडथळा निर्माण होत असल्यामुळं पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेकडून न्यायालयीन लढाई लढण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर आज ही तोडक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, काढण्यात आलेल्या घरांच्या बदल्यात 13 पात्र रहिवाशांना अन्यत्र घरे देण्यास पालिकेने तयारी दाखवली आहे. मात्र रहिवाशांकडून घर घेण्यास नकार देण्यात आला आहे. अखेर आज न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर पालिका के/पूर्व विभागाचे सहाय्यक अभियंता भूपेंद्र राणे यांच्या माध्यमातून दोन जेसीबी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या: