वसई: वसई-विरार क्षेत्रात खंडणीच्या गुन्ह्यांचे सत्र सुरुच आहे. 31 मार्चपासून आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे दाखल झाले आहेत.


आज वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

विरारचे बिल्डर व्यावसायिक धर्मेश गांधी यांच्याविरोधात एका व्यक्तीने 2016 मध्ये तक्रार केली होती. त्यावेळी बांधकामावर कारवाई न करण्याच्या बदल्यात, सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी या बांधकाम व्यावसायिकांकडून 25 लाखाची खंडणी मागितली होती.

त्यातील पाच लाखाची रक्कम प्रेमसिंग यांनी कार्यालयातच स्वीकारली होती. याप्रकरणी गांधी यांच्या तक्रारीवरुन, प्रेमसिंग जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात  दोन अनोळखी इसम देखील आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी प्रेमसिंग जाधव याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार  आहेत.

पालघर पोलिसांनी यावेळी पुन्हा आवाहान केलं आहे की, वसई-विरार क्षेत्रात कुणीही माहिती अधिकाराअंतर्गंत माहिती मागवून, धमकावून पैसे मागितले असतील, तर बिनदास्त तक्रार करण्यास पुढे यावे, पालघर पोलीस त्यांना सर्वोतपरी सहकार्य करेल.