धारावी परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 Mar 2017 10:48 PM (IST)
मुंबई : संपूर्ण मुंबई होळी साजरी करण्यात दंग असताना धारावीतली संगम गल्ली गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेली आहे. संगम गल्लीमध्ये अज्ञातानं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात मृत व्यक्तीसोबत हल्लेखोराची ओळख पटली नसून, कोणत्या कारणावरून ही हत्या झाली हे देखील समजलेलं नाही. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत व्यक्ती आणि हल्लेखोरांची ओळख पटली नसल्यानं या हत्याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान धारावी पोलिसांसमोर आहे.