मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीची चौकशी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना 100 ट्रक पशूखाद्य, धान्य, पिण्यासाठी पाण्याचे टँकर या वस्तूचं वाटप शिवसेनेकडून केलं जाणार आहे. कसा असेल उद्धव ठाकरेंना मराठवाडा दुष्काळ दौरा - सकाळी 9 वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन - सकाळी 10 वाजता बीड येथे हेलिकॉप्टरने आगमन - बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पशूखाद्य वाटप - सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची बीडमध्ये जाहीर सभा - दुपारी 2 वाजता जालन्याला गाडीने पोहोचणार - जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना अन्न-धान्य वाटप - संध्याकाळी 4 वाजता परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि दुष्काळग्रस्तांना मदत, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप - संध्याकाळी 7 वाजता औरंगाबादहून मुंबईकडे परतीचा प्रवास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 ते 16 जानेवारी दरम्यान संपूर्ण दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत.