मुंबई : मोदीजी, कृपया एकच काम करा, महाराजांचे गडकिल्ले पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत ते मोकळे करुन द्या, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. मुंबईत शिवस्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.


शिवरायांचं स्मारक बांधणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. त्या काळात सिंधुदुर्ग बांधला, तसंच शिवस्मारक सरकारने बांधावं. 400 वर्षांपूर्वी तंत्रज्ञान कोणतं होतं?, सिंधुदुर्ग कसा बांधला, एखाद्या खडकावर सिंधुदुर्ग बांधणं हे साध्यासुध्या माणसाचं काम नव्हतं. ते आमच्या दैवतेने केलं.

त्यामुळे मोदीजी, कृपया एकच काम करा, महाराजांचे गडकिल्ले पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत ते मोकळे करुन द्या. किल्ले महाराष्ट्राचे, किल्ले महाराजांचे तिथे काही करायचं म्हटलं तर दिल्लीतील पुरातत्व खात्याकडे जावं लागतं. ते काम आमच्याकडे द्या, आम्ही त्यांची चांगली निगा राखतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ