मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा झाली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ठाकरेंना आणखी एक धक्का बसला ते निकटवर्तीय असलेल्या वरळीतील सचिन अहिर यांचा. सचिन अहिर यांनीही ठाकरेंचा साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विधानपरिषद उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केला आणि ते विधानपरिषद उपसभापती झाले. आता, याच विधानपरिषद उपसभापतींची ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नसून गिरणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात होती. याबाबत, स्वत: सचिन अहिर यांनी माहिती दिली.  सचिन अहिर हे विधानपरिषद उपसभापति असले तरी ते राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे (इंटक) अध्यक्ष आहेत. त्यामुळेच आमदार दिलीप सोपल यांच्या मतदारसंघात असलेल्या केंद्र सरकारच्या मिलसंदर्भात आणि तेथील कामगारांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सोपल यांनी सचिन अहिर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी, लवकरच आम्ही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांना भेटणार असून आपणही आमच्यासोबत यावे, असे निमंत्रणच सोपल यांना दिले. तसेच शिवसेनेच्या 13 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार असल्याचं अहिर यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळांतर्गत चालणाऱ्या गिरण्या कोरोना लॉकडाऊनपासून बंद आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 5 मिल्सचा समावेश असून मुंबईतील तीन, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी आणि अमरावतीच्या अचलपूरमधील मिलही बंद आहेत. तब्बल 6 वर्षांहून अधिक काळापासून ह्या मिल बंद असल्याने येथील कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. येथील कायम कामगारांना सरकारकडून पगार दिला जातो, मात्र गेल्या 10 महिन्यांपासून त्याचा हा पगार रखडल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न कामगारांपुढे आहे. त्याच अनुषंगाने दिलीप सोपल यांनी सचिन अहिर यांच्याशी चर्चा केली. 

खासदारांचे शिष्टमंडळ नरेंद्र मोदींना भेटणार

बार्शीतील बंद असलेल्या बार्शी टेक्स्टाईल मिलमधील कामगारांच्या प्रलंबित वेतन व इतर देयकाबाबत राष्ट्रीय गिरणी कामगार संघांचे प्रमुख तथा विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांना भेटून सविस्तर चर्चा केली. यावेळी, अहिर यांनी लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदार यांच्या शिष्टमंडाळासह बैठक लावूया तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार सोपल यांनी दिली. सोपल यांच्या या भेटीमुळे आणि सचिन अहिर यांनी दिलेल्या आश्वासनामुळे गिरणी कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

Continues below advertisement

हेही वाचा

लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?