मुंबई : भांडुप पोलिस ठाण्यात एका आरोपीचा वाढदिवस साजरा करणं पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. भांडुप पोलिस स्टेशनच्या दोन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोन सातचे पोलिस आयुक्त अखिलेश सिंह यांनी ही कारवाई केली.
23 जुलै रोजी आयान खानचा वाढदिवस होता. भांडुप पोलिस ठाण्याच्या इमारतीत एका कक्षात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी आयानला केक भरवताना स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर अखेर चार पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आयान खान हा पोलिसांच खबरी आहे. परंतु त्याच्यावर 2010 मध्ये मारामारी आणि अपहरणा यांसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. अपहरणाच्या गुन्ह्यातून त्याचं नाव कमी केलं तर दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा समावेश नसल्यामुळे न्यायालयात बी समरी फाईल करण्यात आली होती.
आरोपीचा वाढदिवस साजरा करणं महागात, भांडुप पोलिस स्टेशनचे दोन पीएसआय, दोन हवालदार निलंबित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2019 09:23 AM (IST)
23 जुलै रोजी आयान खानचा वाढदिवस होता. भांडुप पोलिस ठाण्याच्या इमारतीत एका कक्षात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -