Tukaram Mundhe: संपूर्ण देशात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात तीव्र जनआक्रोश आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्र सरकारला अखेर एक पाऊल मागे घेत युवाशक्तीपुढे नमतं घ्यावं लागलं आहे. परिणामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली, मात्र एखाद्या जनआंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नावाचे बॅनर लक्षवेधी ठरले आहे.

Continues below advertisement

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अवैध धंद्यांविरोधात एक मोठी मोहीम छेडली आहे. त्यांनी गेल्या काही काळापासून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करत त्यांनी नियमांचे उल्लंघन उघडकीस आणले. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' ही विशेष मोहीम अत्यंत आक्रमकपणे राबवली जात आहे. त्यांच्या याच धाडसी आणि पारदर्शक कामामुळे ते पुन्हा एकदा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले असून, मोर्चाच्या ठिकाणी त्यांच्या समर्थनाचे फलक झळकताना दिसत आहेत.

Thackeray Brothers Tiranga Rally: ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मुंबईत 'तिरंगा रॅली'

तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा हा मोठा विजय असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संयुक्त नेतृत्त्वाखाली आज (रविवारी) मुंबईत भव्य 'तिरंगा रॅली' काढण्यात येत आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Thackeray Brothers Tiranga Rally: शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाही पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरेंच्या रॅलीला पाठिंबा जाहीर केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. काँग्रेस पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे.

Thackeray Brothers Tiranga Rally: शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत 'जेन झी' विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी जमल्याने मुंबई पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. शिवसेना भवनाकडून शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले असून, केवळ जल्लोषासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस बल आणि होमगार्ड्सचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा