मुंबई: मुंबई महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले प्रशासकीय वादाचे पडसाद आता बदल्यांच्या रूपाने उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणावरून (BMC Transfer) महापौरांच्या भूमिकेवर चर्चा झाली होती, अशातच आता पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्तांसह कार्यकारी अभियंत्यांच्या (BMC Transfer) बदल्यांचे आदेश पालिकेने जारी केले आहेत. यामध्ये महापौरांच्या प्रभागातील सहाय्यक आयुक्तांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Continues below advertisement

गजानन बेल्लाळे आता कुलाबा, नरिमन पॉईंटचे 'बॉस'

मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या नवीन पत्रकानुसार, 'एन' (घाटकोपर) प्रशासकीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची बदली आता 'ए' (कुलाबा, नरिमन पॉईंट) विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी करण्यात आली आहे. बेल्लाळे यांच्याकडे असलेला 'करनिर्धारण व संकलन' विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासनाने कायम ठेवला आहे.(BMC Transfer)

कार्यकारी अभियंत्यांवर नव्या जबाबदाऱ्या

सहाय्यक आयुक्तांसोबतच कार्यकारी अभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवण्यात आले आहे, तर काहींना प्रभारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

Continues below advertisement

अधिकारी आणि त्यांच्या बदल्यांची ठिकाणे खालीलप्रमाणे:

१) गजानन बेल्लाळे: सहायक आयुक्त (ए विभाग) आणि करनिर्धारण व संकलन पदाचा अतिरिक्त कार्यभार.२) रोहित त्रिवेदी: सहायक आयुक्त (आर/उत्तर विभाग) - अतिरिक्त कार्यभार.३) आनंद कंकाळ (कार्यकारी अभियंता): सहायक आयुक्त (ई विभाग) - पूर्णवेळ कार्यभार.४) नयनीश वेंगुर्लेकर: नगर अभियंता विभागाकडे परत.५) जयदीप मोरे: नगर अभियंता विभागाकडे परत.