मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र प्रसाद लाड यांचं नाव निश्चित करण्यासाठी मध्यरात्री बैठकांचं सत्र सुरु होतं. अतिशय वेगवान हालचाली झाल्या. रात्री 9.30 वाजता पहिली बैठक झाली, मग रात्री-मध्यरात्री आणखी काही बैठका पार पडल्या आणि सकाळी प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली.
रात्री-मध्यरात्री झालेल्या बैठकींचं सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण प्रत्येक बैठकीला मोठा अर्थ आहे. पाहूया कुणा-कुणामध्ये किती वाजता बैठक झाल्या :
वेळ : रात्री 9 वाजता :
विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या रेसमधून आऊट झालेले नारायण राणे यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल 2 तास दोघांमध्ये चर्चा झाली. राणे
वेळ : रात्री 11.10 वाजता :
नारायण राणे ‘वर्षा’ बंगल्यावरुन बाहेर पडले. या बैठकीत राणेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राणेंना उमेदवारी देण्याची शाश्वती मिळाली असल्याचं म्हटलं जात आहे.
वेळ : रात्री 11.20 वाजता :
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
वेळ : रात्री 1 वाजता :
प्रसाद लाड यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेनं प्रसाद लाड यांना पाठिंबा जाहीर केला.
वेळ : रात्री 2 वाजता :
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंचा पाठिंब्याचा निरोप घेऊन ‘वर्षा’वर पोहचले. तिघांच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये लेखी सांमंजस्य करार झाला. यावर सही करण्यासाठी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनाही पहाटे 4 वाजता ‘वर्षा’वर बोलवण्यात आलं.
वेळ : सकाळी 7 वाजता :
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी प्रसाद लाड यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांना सकाळी 11 वाजता अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे निरोप धाडण्यात आले.
भाजपमध्ये नाराजीचा सूर
या पोटनिवडणुकीसाठी माधव भांडारी, शायना एनसी अशी पक्षातील निष्ठावंतांची नावं आघाडीवर असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांनी बाजी मारली. यामुळे भाजपात नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे.
तर शेतकरी आणि सर्वसमन्यांच्या हिताचं निमित्त करुन रोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे दोन मित्रपक्ष सत्तेच्या बेरजेसाठी पुन्हा गळ्यात गळे घालताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
संबंधित बातम्या :
विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
विधानपरिषद पोटनिवडणूक : प्रसाद लाड यांची कारकीर्द
संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Nov 2017 12:13 PM (IST)
रात्री 9.30 वाजता पहिली बैठक झाली, मग रात्री-मध्यरात्री आणखी काही बैठका पार पडल्या आणि सकाळी प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -