मुंबई : तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर म्हणजेच ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल या मार्गावर गुरुवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मेगाब्लॉकच्या काळात दुपारी 12.12 ते 2.05 या वेळेतील ठाणे ते वाशी-नेरुळ लोकल रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
वाशीहून ठाण्याला जाणाऱ्या लोकल 12.21 ते 2.02 आणि नेरुळहून ठाण्याला जाणाऱ्या लोकल 12.18 ते 1.04 या वेळेत रद्द करण्यात येतील.
मेगाब्लॉकच्या काळात पनवेल-ठाणे लोकलही बंद असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी मेगाब्लॉकच्या काळात हार्बर रेल्वे आणि मध्य रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.