अनिल गोटे म्हणाले की, "अवधान गावात भाषण करत असताना माझ्यावर देशी कट्ट्यातून नेम धरला होता, पण एका अज्ञात डॉक्टराने कट्टा हिसकावून घेतल्याने माझे प्राण वाचले, अशी कबुली वाडेकर नावाचा व्यक्ती देत असल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. स्थानिक भाजप आमदारानेच हत्येचा कट रचला होता. याबाबत धुळेच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवूनही अद्याप कारवाई झालेली नाही."
"महाराष्ट्र वेगाने गुन्हेगारीकडे वळत आहे. इथे आमदार सुरक्षित नसेल, त्याच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य मजकूर व्हायरल करणाऱ्याला जामीन मिळात असेल तर इतरांचं काय होणार?" असा सवालही गोटे यांनी उपस्थित केला.
तसंच भाजपमध्ये गुन्हेगारांच्या वाढत्या प्रवेशावर बोलताना गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. गोटे म्हणाले की, "भाजपचे 62 पैकी 57 उमेदवार दुसऱ्या पक्षातून आले आहेत. 57 पैकी 28 हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, अपहरणासारखे गुन्हे आहेत."