ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2017 08:10 PM (IST)
NEXT PREV
ठाणे : ठाण्यात प्रचाराचा नारळ पत्नीवर भिरकावणारे शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील विजयी झाले आहेत. नारळ लागल्याने माणिक यांच्या पत्नी संगीता पाटील जखमी झाल्या होत्या. संगीता या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. प्रकरण काय आहे? ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील प्रभाग 16 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित होते. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटीलही त्यावेळी गेल्या. इतकी वर्ष कुठे होता असा प्रश्न पती माणिक पाटील यांनी करताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.