वारंवार तक्रार करुनही गॅस मीटर चालू केलं नसल्याचा जाब विचारण्यासाठी ठाण्यातील काही सामान्य महिला महानगर गॅस कार्यालयात गेल्या होत्या. मात्र त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं न देता त्यांना दमदाटी करण्यात. इतकंच नाही, तर आपल्यावर हात उगारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना बेदम चोप दिला, तर महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करुन खाली पाडण्यात आलं.
महानगर गॅस पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक पैशांची मागणी केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. यावेळी वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळावरुन मनसे महिला कार्यकर्त्या आणि महानगर गॅस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.