ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी ११४ उमेदवार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. या कोट्यधीश उमेदवारांमध्ये शिंदे गटातील उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता ३८१ कोटी रुपये आहे. त्यानंतर शिंदे सेनेतील बाबाजी पाटील यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करतांना त्यात आपली एकूण मालमत्ता १२६ कोटी ६६ लाख असल्याचे नमुद केले आहे.
तसेच कळव्यातील शिंदे सेनेचे तरुण उमेदवार मंदार केणी यांच्या नावावर देखील १०५ कोटींची संपत्ती असल्याने त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. तर सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार म्हणजे मुंब्रा येथील शरद पवार गटाचे खांचे मोहम्मद जैद अतिक खांचे असून, त्यांचे एकूण उत्पन्न केवळ २० हजार ५०२ रुपये इतके असल्याचे दिसून येते. तर अपक्ष उमेदवार प्रमिला केणी ६१ कोटी ६८ लाख, कविता पाटील यांच्या नावावर ५५ कोटी ८२ लाख, विकास दाबाडे - २२ कोटी ८ लाख,लॉरेन्स डिसोझा - १६ कोटी २७ लाख, भुषण भोईर - १४ कोटी ६८ लाख एवढी एकूण मालमत्ता दाखविली आहे.
BMC Election 2026: माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पटीने ते पाच पट्टीने वाढ
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पटीने ते पाच पट्टीने वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभागासाठी तब्बल १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह -माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माजी महापौर व माजी नगरसेवक कोट्याधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना स्वतःची, पत्नीची तसेच अवलंबितांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक ठेवी, शेअर्स, दागिने आणि कर्जाची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे.
त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत काही माजी नगरसेवकांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घर, फ्लॅट, व्यावसायिक गाळे, भूखंड यासह बँक ठेवी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याची नोंद आहे. काही माजी नगरसेवकांनी उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न आणि पगार असल्याचे नमूद केले असले तरी, मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.
BMC Election 2026: कोणाची किती संपत्ती वाढली
- माजी महापौर किशोरी पेडणेकर एकूण मालमत्ता - यांची ५ कोटी २६ लाख २०१७ साली - १ कोटी ६१ लाख ५३ हजार रुपये होती.- माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक २०२) एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : ४६ कोटी विधानसभा निवडणूक २०२४ लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता ४४ कोटी होती वाढ : एका वर्षात २ कोटी- माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. १९१) स्थावर - जंगम मालमत्ता: २१ कोटी८३ लाख २०१७ मध्ये : १४ कोटी ३७ लाख वाढ : ७ कोटी- यामिनी जाधव (प्रभाग २०९) एकूण मालमत्ता : १४ कोटी ५७ लाख विधानसभा २०२४ लढवली : १० कोटी१० लाख वाढ : १ वर्षात ४ कोटी- नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. १०७) एकूण मालमत्ता : ९ कोटी २०१७ मध्ये : १ कोटी ९९ लाख वाढ : ८ वर्षात ७ कोटी- तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. २) एकूण मालमत्ता : ५ कोटी २०१७ मध्ये : २५ लाख वाढ : ८ वर्षात ४ कोटी ७५ लाख- शैलेश फणसे - एकूण मालमत्ता २५ कोटी- दीप्ती वायकर - २२ कोटी १ब लाख ७१ हजार- समाधान सरवणकर -- ४६ कोटी ५९ लाख २०१७ मध्ये - ९ कोटी ४३ लाख- यशवंत किल्लेदार एकूण मालमत्ता - ७ कोटी ५ लाख- रवी राजा एकूण मालमत्ता - १० कोटी १२ लाख १७ हजार २०१७ मध्ये - ५ कोटी १२ लाख ८४ हजार- भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे एकूण मालमत्ता - १७ कोटी ६३ लाख रुपये
