पुणे: मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंत्रालयामध्ये एफआरएस हे तंत्रज्ञान सुरु केलं जाणार आहे. मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश करतानाही पास स्कॅनिंग केल्यानंतरच आत मध्ये प्रवेश केला जाणार आहे. ज्या विभागात काम आहे त्याच विभागात संबंधित अभ्यंगताना जावं लागणार आहे. इतर कुठल्याही ठिकाणी जात असेल तर त्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कशी आहे ही यंत्रणा जाणून घ्या सविस्तर
कशी आहे एफआरएस यंत्रणा जाणून घ्या सविस्तर
* मंत्रालयात जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर अभ्यंगताना ऑनलाईन पास स्वता काढता येईल किंवा मंत्रालय गेटवर काढता येईल.
* मंत्रालयाच्या गेटवरून प्रवेश केल्यानंतर इमारतीमध्ये प्रवेश करताना पुन्हा स्कॅन केल्याशिवाय ईमारतीत प्रवेश मिळणार नाही.
* अभ्यंगताना ज्या विभागात जायचं आहे त्या ठिकाणाहून दुसरीकडे गेले तर पोलिसांची यावर करडी नजर असणार आहे.
* मंत्रालयात येऊन कोणी आत्महत्या करण्याचा किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास पुन्हा त्या अभ्यंगतीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही ब्लॅक लिस्टमध्ये नाव टाकले जाणार आहे.
* या तंत्रज्ञानामुळे पास घेण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर तासन् तास उभे राहण्याची गरज लागणार नाही.
* सर्व सचिव अधिकारी मंत्री यांनाही फेस आयडी तयार केल्यानंतरच प्रवेश मिळणार
* त्यामुळे मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवरती मर्यादा येणार आहे.
* प्रत्येक गेटवरील एफआरएस सिस्टम ही मंत्रालय कंट्रोल रुमला कनेक्ट असणार आहे.
* त्यामुळे अभ्यंगत किंवा आलेला व्यक्ती मंत्रालयात कुठे जातोय यावरती पोलिसांच लक्ष असणार आहे.
* मंत्रालयात साधारणता 8000 अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या आहे. कॅबिनेटच्या दिवशी अभ्यंगताची संख्या पाच ते सहा हजार असते त्यामुळे 12 ते 15 हजारवरती ही गर्दी होते.
* गर्दी आणि घडणाऱ्या घटनांना थांबविण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात येत आहे.