मुंबई : शिक्षक  मेगाभरतीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या जानेवारी महिन्यात ही शिक्षक भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधी शिक्षक भरती करण्याचा सरकारचा विचार आहे.


राज्यातील लाखो डीएड, बीएड धारकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. मागील दहा वर्षांपासून ही शिक्षक भरती प्रलंबित आहे. राज्यातील जवळपास 1 लाख 78 हजार उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.


35 हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. 70 टक्के शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार असून ग्रामीण भागातील उमेदवारांना या भरतीचा सर्वाधिक लाभ होणार आहे.


राज्यातील मेगाभरतीत 72 हजार पदांची भरती 


मेगा भरतीअंतर्गत प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांची भरती होणार आहे.

कोणत्या खात्यात किती जागा?

आरोग्य खातं - 10 हजार 568 पदं

गृह खातं - 7 हजार 111 पदं

ग्रामविकास खातं - 11 हजार पदं

कृषी खातं - 2500 पदं

सार्वजनिक बांधकाम खातं - 8 हजार 337 पदं

नगरविकास खातं - 1500 पदं

जलसंपदा खातं - 8227 पदं

जलसंधारण खातं - 2 हजार 423 पदं

पशुसंवर्धन खातं - 1 हजार 47 पदं

मत्स्य खातं - 90 पदं