Teacher Recruitment MPSC : शिक्षक भरती MPSCमार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. पुढे होणारी शिक्षक भरती एमपीएससीमार्फत करण्याचा शिक्षण विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. यामुळं पुढे होणाऱ्या शिक्षक भरती एमपीएससी मार्फत होणार का? असा सवाल केला उपस्थित होत आहे. मात्र निर्णय होईपर्यत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच पार पडणार आहे.
राज्यातील शिक्षक भरती ही एमपीएससी मार्फत घेतली जावी, अशा प्रकारचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तलायकडून शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावासंदर्भात शिक्षण सचिव, एमपीएससीसुद्धा सकारात्मक असल्याची माहिती आहे. मात्र, भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्यासाठी नियमांमध्ये, शिवाय काही तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे.
नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जी शिक्षक भरती सुरू आहे ती पूर्ण होईल, अस शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळातील शिक्षक भरती होईल, ती शिक्षक भरती एमपीएससी मार्फत घेण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे.
सध्या राज्यात पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली होती. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरती मागणी वारंवार केली जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टल द्वारे होत असताना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने भरती प्रक्रिया लांबली. त्यामुळे पुढे शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने कुठल्याही तांत्रिक अडचणी शिवाय पार पडण्यासाठी एमपीएससी सारख्या अनुभवी संस्थेने काम करावे त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI