मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने संप
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2016 09:17 AM (IST)
मुंबई : ओला-उबर सेवेवर कडक निर्बंध घालावेत या मागणीसाठी मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सी संघटना आज मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढचा आठवडा हा मुंबईकरांसाठी पायपिटीचा ठरण्याची शक्यता आहे. आज यासह अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या प्रमुख संघटनांसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्व संघटनांनी टप्प्याटप्प्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून जयभगवान रिक्षा-टॅक्सी संघटना संपावर जाणार आहे. तर 30 ऑगस्ट मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्सच्या रिक्षा आणि टॅक्सी संपावर जाणर आहेत. दुसरीकडे 31 ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार असल्यानं पुढचा आठवडा हा मुंबईकर प्रवाशांसाठी जिकिरीचा ठरणार आहे.