मुंबई: टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वादामुळं बॉम्बे हाऊस सध्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळं मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर रिपोर्टिंगसाठी गेलेल्या मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे हरजित सिंग यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला.

वादानंतर येथील सुरक्षा रक्षकांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

फोटोग्राफर्स मारहाण प्रकरणी टाटांची दिलगिरी:

- आजची घटना खेदजनक आहे. संबंधित फोटोग्राफर्सची माफी मागतो. भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ

 

- मीडिया प्रतिनिधींचं काम किती कठीण असतं याची आम्हाला जाणीव आहे.

 

- आपले संबंध यापुढेही चांगले राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करु.

सध्या पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दरम्यान, सायरस मिस्त्री यांना नुकतंच टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा एकदा चेअरमनपदाची धुरा सांभाळली.