MHADA : टाटा रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान राहण्यासाठी लवकरच म्हाडाची घरे मिळणार, असे स्पष्टीकरण टाटा हॉस्पिटलकडून देण्यात आले. टाटा रुग्णालयातील कँसरग्रस्त रुग्ण फुटपाथवर राहतात ही बातमी एबीपी माझाने दाखवली होती. या बातमीवर आधी म्हाडाकडून त्यानंतर आता टाटा रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
म्हाडाकडून मिळालेल्या 100 खोल्या रुग्णांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त करून पुढील तीन महिन्यात रुग्णांना राहण्यास देणार असल्याचं टाटा हॉस्पिटलने स्पष्ट केलेय. म्हाडाच्या 100 खोल्या आणि हाफकिन्स मधील धर्मशाळामधील खोल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना राहायला मिळाल्यास फुटपाथवरील रुग्णांची संख्या कमी होणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे मदत मिळवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार स्वयंसेवी संस्था आणि सीएसआर माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचा स्वागत, असे टाटाकडून स्पष्ट करण्यात आले.
म्हाडाने टाटा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांना शंभर फ्लॅटस देण्याचा चांगला निर्णय घेतला. टाटा रुग्णालयाच्या जवळ हे शंभर फ्लॅट्स डिसेंबरमध्ये देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून रुग्णांना त्रास कमी व्हावा व राहण्याची सोय व्हावी यासाठी महत्त्वाचा आहे, असे डॉ शैलेश श्रीखंडे यांनी सांगितलं.
मागील वर्षी बीएमसी मीसुद्धा 40 कोटी यासाठी देऊन हत्तींच्या कॅम्पसमध्ये 15 मजल्याच्या धर्मशाळा बांधण्याचे काम सुरू आहे जिथे 208 रूम रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी असतील. म्हाडा आणि बीएमसी ने जी मदत केलीये त्यामुळे जवळपास तीनशे कुटुंबीयांना आपण राहण्यासाठी मदत करू शकतो. म्हाडा कडून निर्णय घेतल्यानंतर घरांचा हॅन्डओव्हर करण्यात आले आहे, या प्रक्रियेला तीन महिने लागले आणि आता या घरांचा ताबा मिळाला आहे. मात्र ही जागा जरी मिळाले असले तरी त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणीतरी हवे आहे. रोटरी कडून आम्ही ज्या शंभर खोल्या आम्हाला मिळाल्या आहेत त्या पेशंट फ्रेंडली करतोय, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
ज्या कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी साठी तीन चार महिने राहावं लागतंय, अशा रुग्णांना राहण्याची सोय व्हावी यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. त्या ठिकाणी काही रहिवासी राहतात त्यांची सुद्धा समजूत आम्ही यामध्ये काढत आहोत. लवकरच हे काम पूर्ण होतील, साधारणपणे 3 महिन्यात कर काम पूर्ण करून तिथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची पूर्णपणे सोय होईल, असेही सांगण्यात आले.
टाटा रुग्णालयात या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार स्वयंसेवी संस्था सीएसआर या सगळ्यांची मदत लागेल. हे सगळ्यात मदतीचं आम्ही स्वागत करू कर हा कारभार एवढा मोठा आहे की जितकी मदत कराल तेवढी कमी आहे. फूटपाथवर राहणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे नक्कीच कमी होईल करण्यासाठीच हे प्रयत्न आमचे सुरु आहेत, असेही टाटा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
संबधित बातम्या :
पवारांकडून अनलॉक, ठाकरेंकडून लॉक; म्हाडाने कॅन्सरग्रस्तांना दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरे मिळणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती
राष्ट्रवादीच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचा 'ब्रेक'; शिवसेना आमदार अजय चौधरी यांचा विरोध कशासाठी?