Supriya Sule On Rahul Narwekar : "जे शिवसेनेचे झाले तेच आमच्याबाबत होत आहे. कॉपीपेस्ट निकाल आहे. यामध्ये काही क्रियेटीव्हिटीही नाही. जे उद्धवजींबरोबर होत आहे. ते पवार साहेबांबाबत एका महिन्यानंतर घडत आहे. तुम्ही नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार? सगळ नियम कायदे, संविधान सोडूनच काम सुरु आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. नार्वेकरांच्या निकालावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असेही सुळे यांनी स्पष्ट केले आहे. अदृश्य शक्तीसाठी नार्वेकर ड्राफ्टिंग करतात. ते फक्त कॉपी करतात. हे फार दुर्दैवी आहे. सुब्रमण्यम यांनी एक पत्र लिहिले आहे. भारतीय जनता पक्ष कसा चालतो, याबाबत त्यांनी त्या पत्रात भाष्य केले आहे, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही गटांचे आमदार पात्र
दोन्ही गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवताना नार्वेकर म्हणाले, पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे.शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता ४१ आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
Rahul Narwekar : शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे : राहुल नार्वेकर